Jagdish Patil
ABVPचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले.
ढेकणे यांनी 1983 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली.
पुणे, सोलापूर, कोकण आणि गोव्यात संघटनमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
त्यानंतर त्यांनी खडकीतील टी. जे. महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. ‘महापालिकांच्या अंदाजपत्रकांचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर PHD केली.
विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना त्यांनी शिक्षण मंत्रालयात विशेष अधिकारी म्हणून काम पाहिले.
विद्यापीठ कायद्यातील बदल आणि खासगी विद्यापीठ कायद्याच्या निर्मितीत योगदान दिले.
CM फडणवीस यांच्या कार्यालयातही त्यांनी विशेष अधिकारी म्हणून काम केलंय.
श्रीपाद ढेकणे यांनी भाजपचे पुणे शहर प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
लोकसभा, विधानसभा आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या.