पुणे महापालिकेच्या बैठकीतून बाहेर काढलं, 'डीजे'वाले अंगावर धावले, BJP नेता संतापला,'विद्यानंद बापट' यांना का होतोय प्रचंड विरोध?

Deepak Kulkarni

DJ वरून वाद

पुणे महापालिकेत काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या पूर्वतयारी बैठकीत DJ आणि कर्णकर्कश साऊंड सिस्टीमच्या वापरावरून मोठा वादंग निर्माण झाला. 

Vidyanand Bapat DJ Controversy | Sarkarnama

बापटांची मागणी

शहरातील नारायण पेठेत राहणाऱ्या विद्यानंद बापट यांनी पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी करताच वातावरण तापलं. 

Vidyanand Bapat DJ Controversy | Sarkarnama

बैठकीतून काढलं बाहेर

त्यांची डीजे आणि लाऊड स्पीकरविरोधातील मागणी समोर येताच त्यांना महापालिकेच्या बैठकीत प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. पोलिसांना त्यांच्याभोवती सुरक्षेचे कडे उभे राहावे लागले. तसेच त्यांना बैठकीतून बाहेर काढण्यात आले. 

Vidyanand Bapat DJ Controversy | Sarkarnama

'खरा आवाज'

लाऊडस्पीकर, DJ किंवा इतर ध्वनीवर्धनाची साधने सार्वजनिक ठिकाणी वापरली जाऊ नयेत आणि गणेशोत्सवातील मंडप अन् मिरवणुकांमुळे वाहतुकीला अडथळा होऊ नये या भूमिकांमुळे बापट पुणेकरांचा 'खरा आवाज' बनले आहे.

Vidyanand Bapat DJ Controversy | Sarkarnama

शब्दांचा खेळ अन् फसवणूक

बापट यांच्यामते दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार, ‘डॉल्बी’, ‘DJ' ,लाऊड स्पीकर बंदी अशा वेगवेगळ्या शब्दांमधून फक्त चर्चा होत राहते; मात्र, तांत्रिक नाव बदलून हैदोस सुरूच राहतो. त्यामुळे मूळ समस्या सुटत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 

Vidyanand Bapat Pune DJ Controversy | Sarkarnama

अंमलबजावणी

केवळ डीजे किंवा इतर ध्वनीवर्धकांच्य़ा डेसिबलची मर्यादा तपासण्यापेक्षा न्यायालयाचा मूळ उद्देश लक्षात घेत सार्वजनिक ठिकाणी त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Vidyanand Bapat Pune DJ Controversy | Sarkarnama

हिंदूविरोधी असल्याचे आरोप

डीजेविरोधात घेतलेल्या या भूमिकेमुळे बापटांवर ते हिंदूविरोधी असल्याचे आरोप केले जात असून ते हास्यास्पद असल्याचंही बापट सांगतात.

Vidyanand Bapat Pune DJ Controversy | Sarkarnama

धर्मस्वातंत्र्याला विरोध नाही...

ते असंही स्पष्टपणे म्हणतात की, धर्मस्वातंत्र्याला माझा विरोध नसून, सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण आणि वाहतुकीचा अडथळा ठरू नये.

Vidyanand Bapat Pune DJ Controversy | Sarkarnama

मोठा पाठिंबा

विद्यानंद बापट हे कंपनीत नोकरीला असून गणेशोत्सवातील डीजेला विरोध करतानाच शांत,संयमी,अभ्यासू अन् मुद्देसूद मांडणीमुळे सध्या चर्चेत आले आहे. त्यांच्या भूमिकेला पेठेतील पुणेकर, पर्यावरणवादी, सामाजिक संस्था, संघटनांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे.

Vidyanand Bapat Pune DJ Controversy | Sarkarnama

NEXT: आता निवृत्तीनंतरही कर्मचाऱ्यांना शासकीय घरामध्ये राहता येणार, जाणून घ्या नवे नियम

Government Housing Relief for Retired Employees | Sarkarnama
येथे क्लिक करा...