Rashmi Mane
बारणेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आज 22 मार्च रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बारणेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
बारणे यांनी यावेळेस तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
विधान परिषद सदस्या उमा खापरे, राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, भाजपच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप आदी उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे उपस्थित होते.
हजारोंच्या संख्येने या रॅलीमध्ये लोक सहभागी झाले होते.
महायुतीचे बारणे विरुद्ध महाविकास आघाडीचे (ठाकरे गटाचे शिवसेना) उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यात लढत चुरशीची होणार आहे.