Deepak Kulkarni
श्वेता मिश्रा या झारखंडमधील धनबादच्या रहिवासी आहेत.
चौथ्या प्रयत्नात त्याने यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत 376 वा क्रमांक मिळवला.
श्वेता मिश्रा यांचे वडील मिथलेश कुमार मिश्रा हे बीसीसीएलमध्ये वरिष्ठ फोरमन आहेत आणि आई सरिता मिश्रा गृहिणी आहेत.
त्यांनी डोनोबिली सीएमआरआय या प्रसिद्ध शाळेतून बारावीपर्यंत व डीयूच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर तिने दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केलं आहे.
कायद्याची पदवी मिळवताच श्वेता यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्यानंतर प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी चौथ्या प्रयत्नात स्वप्न पूर्ण केलं.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा अधिकारी पद मिळालेल्या श्वेता या सिव्हिल सर्व्हिस फिटनेससाठी ओळखल्या जातात.
धकाधकीच्या व प्रचंड तणावाच्या आयुष्यातही त्या रनिंंग आणि व्यायाम यांना प्राधान्य देते.
विशेष म्हणजे त्या दररोज दहा किलोमीटर न चुकता धावतात. तसेच सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेस टिप्स फॉलो करणारे अनेकजण आहेत.