Shyam Rangeela : वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणार श्याम रंगीला!

Mayur Ratnaparkhe

पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करुन प्रसिद्ध झालेला कॉमेडियन श्याम रंगीला वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढवणार आहेे.

श्याम रंगीलाने (Shyam Rangila) एक्स अकाऊंटवरुन मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.

कॉमेडी क्षेत्रात राजकारणाचा शिरकाव झाला असून मीही कॉमेडीच्या माध्यमातून राजकारण करु शकतो असं त्यांने म्हटलं आहे. 

तसेच आपणाला कॉमेडीत हवे तसे काम करता येत नसल्याचा आरोपदेखील त्याने केला आहे.

श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची हुबेहूब मिमिक्री करणारा कलाकार म्हणून खूप प्रसिद्ध आहे.

मोदींच्या मिमिक्रीमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला होता. 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) त्याच्या मिमिक्रीचं कौतुक केलं होतं.

श्याम रंगीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचीदेखील मिमिक्री करतो.

श्यामने निवडणूक लढवण्याचं कारण त्याच्या मिमिक्रीवर घालण्यात आलेलं बंधन हे असल्याचं सांगितलं.

NEXT : राज्यातल्या 'या' मतदारसंघात तिरंगी लढत; पाहा यादी!