Rajanand More
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी गुरूवारी पदाचा राजीनामा दिला. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून सिध्दरामय्या यांनी आपले नाव इतिहासात कोरले आहे.
राज्याच्या राजकारणात सिध्दरामय्या यांनी आपली ओळख 'लोकनेता' अशी निर्माण केली आहे. मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्यांकांसह इतर समाजामध्येही त्यांची लोकप्रियता आहे.
समाजवादी विचारांच्या सिध्दरामय्या यांनी ८० च्या दशकात लोक दल पक्षातून विधानसभेची निवडणूक लढविली आणि जिंकली. त्यानंतर त्यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षात प्रवेश केला.
जेडीएसची पाळेमुळे तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांचा मोठा वाटा राहिला. पण पक्षाचे प्रमुख माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पुत्रप्रेमापोटी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.
सिध्दरामय्या हे कुमारस्वामी यांच्यापेक्षा पक्षात वरचढ ठरू लागले होते. थेट मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये आले होते. पक्षशिस्तीच्या नावाखाली त्यांचे नंतर निलंबन करण्यात आले.
जेडीएसमधून बाहेर पडल्यानंतर सिध्दरामय्या यांनी २००६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर केवळ सात वर्षांतच ते कर्नाटकचे मुख्यमंत्री बनले.
राज्यात अहिंदा म्हणजे अल्पसंख्याक, दलित आणि मागासवर्ग पॅटर्न खूप चालला. सिध्दरामय्या यांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली. आजही या समाजात त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे.
सिध्दरामय्या यांनी आपला करिष्मा कायम ठेवत २०२३ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. यावेळी तीन वर्षे या पदावर राहत त्यांनी इतिहास घडविला. त्यांचा आजपर्यंत प्रवास थक्क करणारा होता.