जावयासाठी बड्या नेत्याचा राजकारणातून संन्यास; पक्षात होता मोठा रुबाब...

Rajanand More

सिध्दार्थ अशोक

बहुजन समाज पक्षाचे मातब्बर नेते सिध्दार्थ अशोक यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Ashok Siddharth | Sarkarnama

काय घडलं?

पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनीच सिध्दार्थ अशोक यांना राजकारणातून संन्यास घेण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियात भावनिक पोस्ट करत याबाबत घोषणा केली.

Mayawati | Sarkarnama

आमदार, खासदार

सिध्दार्थ अशोक हे एक टर्म विधानपरिषदेचे आणि एक टर्म राज्यसभेचे सदस्य होते. तसेच पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक हे पदही त्यांनी भूषविले होते.

Ashok Siddharth | Sarkarnama

सरकारी नोकरी

राजकारणात येण्याआधी ते यूपीतील आरोग्य विभागात कार्यरत होते. सामाजिक संघटनांमध्ये काम करत असतानाच ते बसपाशी जोडले गेले आणि मायावती यांच्या सांगण्यावरून नोकरीचा राजीनामा दिला.

Ashok Siddharth, Mayawati | Sarkarnama

जावई कारणीभूत?

मायावती यांचे भाचे आकाश आनंद हे सिध्दार्थ अशोक यांचे जावई आहेत. मायावती यांनी डॉ. प्रज्ञा आणि आकाश आनंद यांचा विवाह ठरविला होता.

Akash Anand News | Sarkarnama

रुबाब वाढला

थेट पक्षाध्यक्षांचा भाचाच जावई झाल्याने सिध्दार्थ अशोक यांचा रुबाब चांगलाच वाढला होता. आकाश हे राजकारणात सक्रीय झाल्यानंतर सासऱ्यांसोबतचे मायावती यांचे राजकीय संबंध ताणले गेले होते.

Mayawati-Akash Anand News | Sarkarnama

भाच्यालाही घरचा रस्ता

आकाश आनंद यांच्या राजकीय वाटचालीत सासऱ्यांची ढवळाढवळ होत असल्याने मायावती नाराज असल्याची चर्चा होती. सिध्दार्थ अशोक यांनी निवृत्ती घेताच आकाश आनंद यांनाही घरचा रस्ता दाखविण्यात आला.

Mayawati-Akash Anand News | Sarkarnama

नाराजी वाढली

प्रामुख्याने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपादरम्यान सिध्दार्थ अशोक यांनी मनमानी केल्याने मायावती यांची नाराजी ओढवून घेतली होती. अखेर काही महिन्यांच्या घडामोडीनंतर त्यांनी भाच्यासह त्याच्या सासऱ्यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला.

BSP Chief Mayawati | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींपासून विशाल पाटलांपर्यंत अनेक नेत्यांना '1980s Trend’ची क्रेझ; एकदा नेत्यांचा भन्नाट लूक पाहाच...

येथे क्लिक करा.