Sunil Balasaheb Dhumal
भाजपकडून राजसमंद मतदारसंघातून दीप्ती माहेश्वरी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या आई किरण माहेश्वरी मंत्री होत्या.
बिकानेर राजघराण्याच्या महारानी राहिलेल्या सिद्धी कुमारी भाजपकडून आमदार आहेत. बिकानेर पूर्व मतदारसंघातून २००८ पासून त्या सलग निवडून येत आहेत.
काँग्रेस नेत्या दिव्या मदेरणा ओसिया मतदारसंघातून २०१८ मध्ये मोठ्या फरकाने दणदणीत विजयी झाल्या होत्या. आताही त्यांचा विजय पक्का मानला जात आहे.
भाजप नेत्या सलग २० वर्षांपासून आमदार आहेत. राजस्थानच्या मंत्रिमंडळात राहिलेल्या अनिता पुन्हा एकदा अजमेर दक्षिणमधून मैदानात आहेत.
क्रीडा परिषदेच्या अध्यक्ष असलेल्या कृष्णा पुनिया सादुलपूरच्या आमदार आहेत. त्या पुन्हा याच मतदारसंघातून निवडणूक लढवतात.
भाजप खासदार दिया कुमारी विद्याधरनगरमधून आमदारकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंना पर्याय म्हणून दिया कुमारींकडे पाहिले जाते.
दोन वेळा मुख्यमंत्री आणि तीन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेल्या वसुंधरा राजे झालरापाटन मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार आहेत.़