Roshan More
महाराष्ट्रासह सात राज्यांतील मसुदा मतदारयादीतून नावे वगळलेल्या नागरिकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी निवडणूक आयोगाने दिली आहे.
हरियाणा, आंध्र प्रदेश, झारखंड, तेलंगण, नागालॅंड आणि दिल्लीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंतिम मतदारयादीतून कोणताही पात्र नागरिक सुटू नये, याची दक्षता घेण्यासाठी देखरेख ठेवणारी प्रणाली स्थापित करण्याचे निर्देश आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आता वगळण्यात आलेली नावे आणि त्याचे संभाव्य कारण यांची यादी जाहीर करण्यात येईल.
त्यानंतर बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) संबंधित नागरिकांशी संपर्क साधतील.
व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा एसएमएसच्या माध्यमातूनही फॉर्म दिले जातील.
ईपिक क्रमांकाच्या आधारे निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, ईसीआयनेट ॲपवरून फॉर्म भरता येईल.
पत्ता बदलला असेल, तर वेगळ्या प्रक्रियेचा अवलंब केला जाणार आहे.