Gokul president: गोकुळच्या 'अध्यक्ष'पदाला अडथळा, महायुती धोक्यात? जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Gokul election: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या आहेत. अध्यक्ष निवडीतील कोरमचा पेच आणि महायुतीची भूमिका जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरणार आहे.
Gokul president
Gokul presidentSarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur politics News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिला. २५ पैकी १३ जागा जिंकत गोकुळ दूध संघावर सत्ता मिळवली. मात्र प्रत्येक बैठकीला १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असणार आहे. या संख्येने बैठकीचा कोरम पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे २९ रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीच्या सभेतील कोरमच्या पेचाचे सावट निर्माण झाले आहे. सभेला महायुतीचे संचालक अनुपस्थित राहिल्यास सत्ता स्थापनेचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे.

गोकुळच्या निवडणुकीत दणका बसलेल्या महायुतीला पुढे जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धास्ती आहे. राजकीय आडवा-आडवीचे प्रयत्न जिल्हा बँकेत देखील महायुतीसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा याचे परिणाम महायुतीला भोगावे लागतील. त्यामुळे अध्यक्ष निवडीत महायुतीकडून कोणती चाल खेळली जाईल? किंवा समविचारी आघाडीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली जाईल का? हे पहावे लागणार आहे.

समविचारी आघाडीने १३ जागा जिंकत सर्वाधिक जागांवर विजय मिळविला, तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एका जागेच्या फरकाने ठरलेला हा निकाल दोन्ही बाजूंसाठी प्रतिष्ठेचा ठरला आहे. निवडणुकीत दूध उत्पादकांच्या प्रतिनिधींनी दिलेला कौल समविचारी आघाडीच्या बाजूने लागला असला, तरी अध्यक्ष निवडीच्या सभेतील कोरमची अट आता निर्णायक ठरणार आहे. सभेसाठी १४ संचालकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे गृहीत धरल्यास समविचारी आघाडीचे सर्व १३ संचालक उपस्थित राहूनही आणखी एका संचालकाची उपस्थिती आवश्यक ठरू शकते.

Gokul president
Gokul Chairman Election : 'गोकुळ'चे संचालक सहलीवर, अध्यक्षपद निवडीत 'गेम' होणार? सतेज पाटलांकडून खबरदारी!

जर महायुतीच्या संचालकांनी अनुपस्थिती लावली तर सहकार क्षेत्रातील आगामी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पाश्वभूमीवर त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. शिवाय पुन्हा एकदा महायुतींच्या नेत्यांविरोधात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Gokul president
Government Orders Headmasters : मुख्याध्यापकांसाठी सरकारचा मोठा आदेश; आता 'त्या' शाळांचे उंबरठे झिजवावेच लागणार! काय आहे कारण?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदान करणारे ठरावधारक हे केवळ राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे पाहून निर्णय घेतात, असे नाही. सहकारी संस्थांचे हित, स्थानिक नेतृत्वाशी असलेले संबंध, संस्थांच्या कामकाजातील सहभाग आणि राजकीय भूमिकांतील सातत्य या बाबीही त्यांच्या निर्णयावर परिणाम करू शकतात. त्यामुळे गोकुळमधील अध्यक्ष निवडीच्या वेळी घेतलेली भूमिका जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या बाजूने जाणार की विरोधात, हा महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. जर निर्णय विरोधात घेतला तर पुन्हा एकदा महायुतीच्या विरोधात एकटे सतेज पाटील लढा देतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com