Ganesh Sonawane
SIT चौकशी म्हणजे 'विशेष तपास पथक' (Special Investigation Team) द्वारे केली जाणारी चौकशी होय.
जेव्हा एखादे प्रकरण खूप गंभीर किंवा संवेदनशील असते आणि नियमित तपास यंत्रणा ते हाताळण्यास सक्षम नसेल, तेव्हा सरकार किंवा न्यायालय अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी एका विशेष गटाची नेमणूक करते, ज्याला SIT म्हणतात.
अशा प्रकरणांमध्ये निष्पक्ष आणि सखोल चौकशी करणे, जेणेकरून सत्य बाहेर येईल.
या पथकात पोलीस अधिकारी किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो, जे फॉरेन्सिक तंत्रज्ञान आणि इतर विशेष तपासांमध्ये प्रशिक्षित असतात.
भारत सरकार, राज्य सरकार किंवा सर्वोच्च न्यायालय एखाद्या विशिष्ट प्रकरणात SIT नेमण्याचा अधिकार ठेवतात.
एसआयटी चौकशी गंभीर गुन्हे जसे की खून, बलात्कार, चोरी, हत्या तसेच असे गुन्हे ज्यांच्यामध्ये मोठा घोटाळा किंवा गुप्त हेतू असतो अशा प्रकरणात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले जातात.
अनेक आरोप-प्रत्यारोप असलेले गुन्हे. ज्या गुन्ह्यांची चौकशी सामान्य पोलिसांना अशक्य वाटते अशावेळी एसआयटी नेमली जाते.
एसआयटी चौकशीचा उद्देश गुन्ह्याचा सखोल तपास करणे, पुरावे गोळा करणे आणि आरोपींना शोधून कायदेशीर कारवाई करणे हा असतो.