Ganesh Sonawane
तुम्हाला निवडणुकीत उभा असलेला एकही उमेदवार पसंत नसेल आणि तुम्हाला त्यांच्यापैकी कुणालाही मत द्यायचे नसेल, तर तुम्ही काय कराल?
त्यासाठी निवडणूक आयोगाने एक व्यवस्था केली आहे. त्यावेळी तुम्ही NOTA बटण दाबून तुमचा निषेध नोंदवू शकता.
नोटा म्हणजे 'None Of The Above'‘यापैकी कुणीही नाही’ असा याचा अर्थ होतो. जर EVM वर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही नोटाला मत देऊ शकता
कोर्टाच्या निर्णयानंतर भारतीय निवडणूक आयोगाने पहिल्यांदा नोटाचा वापर २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत केला.
निवडणुकीच्या माध्यमातून (NOTA) हा केवळ एक संदेश देतो की, किती टक्के मतदारांना कोणताही उमेदवार नको आहे.
भारतासह एकुण १४ देशांमध्ये NOTA हा पर्याय उपलब्ध आहे. यापैकी काही देश असेही आहेत की तिथे NOTA ला जास्त मते मिळाल्यास निवडणूक रद्द होते.
काही देशांमध्ये NOTA पेक्षा कमी मते ज्या उमेदवाराला पडतील असा उमेदवार पुन्हा निवडणूक लढवू शकत नाही असाही नियम आहे.
पण भारतात निवडणुक आयोगाच्या सांगण्यानुसार अशापरिस्थिती प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते मिळविणारा उमेदवार निवडून आल्याचे घोषित केले जाते.