Jayant Patil : महाराष्ट्राच्या राजकारणातील चतुरस्त्र राजकारणी : जयंत पाटील

Vijaykumar Dudhale

सांगली येथे जन्म

जयंत पाटील यांचा जन्म सांगली येथे १६ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. ते राजारामबापू पाटील यांचे चिरंजीव आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

लोकाग्रहास्तव राजकारणात प्रवेश

जयंत पाटील यांचे शिक्षण सिव्हिल इंजिनअरपर्यंत झालेले आहेत. इंजिनअरिंगमध्ये मास्टर डिग्री घेण्यासाठी ते अमेरिकेला गेले होते. मात्र, राजारामबापू पाटील यांच्या निधानामुळे त्यांना परत यावे लागले. सांगलीत परतल्यानंतर लोक आग्रहास्तव त्यांना राजकारणात उतरण्याचा निर्णय घ्यावा लागला.

Jayant Patil | Sarkarnama

पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश

जयंत पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात शेकापमधून झाली असली तरी त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Jayant Patil | Sarkarnama

पवारांना कायम साथ

राजकारणाच्या सुरुवातीपासूनच जयंत पाटील हे शरद पवारांसोबत कायम राहिलेले आहेत. ते आजतागायत पवारांसोबत आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

वाळव्यातून पहिल्यांदा लढवली विधानसभा

जयंत पाटील यांनी १९९० मध्ये पहिल्यांदा वाळवा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर त्याचे नाव इस्लामपूर झाले. ते १९९० पासून आजपर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम

विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर २००८ मध्ये जयंत पाटील हे राज्याचे गृहमंत्री झाले होते.

Jayant Patil | Sarkarnama

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष

जयंत पाटील यांची २०१८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून ते आजपर्यंत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

Jayant Patil | Sarkarnama

शरद पवार गटाचे प्रमुख नेते

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. ते आज पवारांच्या गटाचे प्रमुख नेते आहेत

Jayant Patil | Sarkarnama

निवडणूक लढविणारे पहिले ठाकरे : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा