Rashmi Mane
मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोणताही व्यक्ती आयुष्यात खूप यशस्वी होऊ शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे IAS अधिकारी स्मिता सभरवाल.
स्मिता सभरवाल यांनी वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास करुन स्मिता सभरवाल यांनी मोठे यश मिळवले आहे.
त्यांनी वर्ष 2000 मध्ये UPSC परीक्षेत चौथी रँक मिळवून टॉपर्सपैकी एक होण्याचा गौरव मिळवला. त्यानंतर त्यांना तेलंगाना कॅडर मिळाले.
स्मिता सभरवाल यांनी आपला करिअरमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
2024 मध्ये त्यांना तेलंगाना सरकारमध्ये युवा उन्नती, पर्यटन आणि संस्कृती (YAT&C) या विभागाची मुख्य सचिव नियुक्त करण्यात आले.
स्मिता सभरवाल सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या ग्लॅमरस आणि फॅशनसेंसची झलक दिसून येते.
स्मिता सभरवाल यांचे कार्य लोकसेवा, प्रशासन आणि नेतृत्व यामध्ये एक आदर्श उदाहरण आहे.
त्यांनी समाजासाठी केलेले योगदान, त्यांची कार्यक्षमता आणि समाजातील महिला अधिकारांसाठी केलेले प्रयत्न प्रेरणादायी आहे. त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना केवळ तेलंगानातच नव्हे तर संपूर्ण देशात ओळख मिळाली आहे.