Rashmi Mane
टीव्हीवरील ‘तुलसी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृती ईरानी आज राजकारण, समाजकारण आणि अभिनय या तीनही क्षेत्रांत आपली छाप सोडली आहे. 50 वर्षांनंतरही त्यांनी शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर अप्रतिम फिटनेस मिळवला आहे.
स्मृती सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन करतात. हे पचन सुधारून शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. त्यानंतर त्या फ्रेश सेब किंवा गाजराचा जूस घेतात.
नाश्त्यात उकडलेले अंडे, पोहे किंवा प्रोटीनयुक्त हलके पदार्थ. हा नाश्ता त्यांना दिवसभर ताजेतवाने ठेवतो आणि मेटाबॉलिज्म सुधारतो.
दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या, एक वाटी दाळ आणि दोन चपात्या किंवा ब्राउन राइस. त्यासोबत दही जे अन्न पचनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
संध्याकाळच्या वेळी हलके, पौष्टिक तसेच एनर्जी देणारे स्नॅक्स त्यांना आवडतात. सुकामेवा, फळे किंवा सेंव. त्यासोबत एक कप ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी.
त्यासोबतच रात्री नेहमी हलका आहार करतात, त्यात सूप, स्टीम्ड वेजिटेबल्स किंवा फिश आणि एक-दोन चपात्या.
फिटनेससाठी स्मृती योग, प्राणायाम आणि ध्यानावर विशेष भर देतात. यामुळे मानसिक स्थिरता आणि शारीरिक तंदुरुस्ती दोन्ही जपल्या जातात.