Rashmi Mane
स्मृती इराणी टीव्हीवरील 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'च्या रिबूटमध्ये ती तुलसी विराणीच्या भूमिकेत परतणार आहे.
'क्यूंकी सास भी कभी बहू थी' चा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
10 वर्षे केंद्रीय मंत्री राहिलेल्या स्मृती इराणी यांचे टीव्हीवर पुनरागमन होत आहे.
त्यातच 25 वर्षांपासून टीव्ही आणि राजकारणात सक्रिय असलेल्या स्मृती इराणी यांना शोच्या एका भागासाठी 14 लाख रुपये देऊ केले जात असल्याची चर्चा आहे.
जवळजवळ अडीच दशकांपासून राजकारणात असलेल्या स्मृती इराणी यांची संपत्ती किती.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात स्मृती इराणी यांनी त्यांच्या कुटुंबाची एकूण 17.6 कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचे सांगण्यात आले होते.
प्रतिज्ञापत्रानुसार, स्मृती आणि त्यांच्या पतीची एकूण जंगम मालमत्ता 6.38 कोटी रुपये आणि स्थावर मालमत्ता 11.17 कोटी रुपये आहे.
इराणी यांच्या जंगम मालमत्तेत 37 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आहेत. तर 27 लाख रुपयांच्या कार, 25 लाख रुपयांच्या बँक ठेवी आणि सुमारे 1.25 कोटी रुपयांची गुंतवणूक समाविष्ट आहे.