Jagdish Patil
लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना 90 तास काम करण्याचा अजब सल्ला दिला आहे.
एका कर्मचाऱ्यांशी संवाद साधतानाचा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
ते म्हणाले, "मी तुम्हाला रविवारी काम करायला लावत नाही याचा मला पश्चात्ताप वाटतो. मी रविवारी काम करायला सांगितलं तर मला आनंद होईल.”
तुम्ही रविवारी घरी बसून काय करता? पत्नीकडे किती वेळ पाहणार? त्यापेक्षा ऑफिसमध्ये येऊन काम करा; असंही ते म्हणाले.
त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर अभिनेत्री दीपिका पदुकोणसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
तर इतरांना 90 तास काम करण्याचा सल्ला देणाऱ्या SN सुब्रमण्यन यांना 2023-24 या आर्थिक वर्षात 51 कोटी रुपये इतका पगार मिळाला आहे.
सुब्रमण्यन यांचा पगार लार्सन अँड टुब्रोमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगारापेक्षा 534.57 पट जास्त आहे.
दरम्यान, याआधी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवड्याला 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता.