Ganesh Sonawane
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पुढाकार घेतला आहे.
आळंदी येथील (जिल्हा पुणे) स्नेहवन या संस्थेमार्फत त्यांनी 'आपुलकी' हा नवा उपक्रम हाती घेतला आहे.
जळगाव जिल्हा प्रशासन स्वतः शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेट देऊन गरजू मुलांची (पहिली ते पाचवी पर्यंत) यादी तयार करत आहे.
साधारणपणे ३० ते ४० विद्यार्थ्यांना निवडून त्यांना आळंदीच्या सेंटरला पाठवले जाणार आहे.
इच्छुक व पात्र कुटुंबांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२२३१८० / ०२५७-२२१७१९३ वर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त ज्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपल्या पात्र मुलांची नोंदणी १५ मेपर्यंत करून घ्यावी.
'स्नेहवन'मध्ये मुलांना एआय (AI), रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण दिले जाते, तसेच तेथे राहण्याची व जेवणाची उत्तम सोय आहे.