Deepak Kulkarni
अंजली दमानिया या भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
माहिती अधिकार कायद्याद्वारे त्यांनी आत्तापर्यंत अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत.
त्यांनी २०१४ मध्ये भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरमधून लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांचा मोठा पराभव झाला.
आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर 2015 मध्ये त्यांनी भष्ट्राचाराचे आरोप केले होते.त्यानंतर त्यांनी आप पक्षही सोडला.
दमानिया यांनी छगन भुजबळ आणि एकनाथ खडसे यांच्याविरोधात अनेक जनहित याचिका दाखल केल्या. त्यांच्या उपोषणामुळे 2016 मध्ये खडसेंना नाईलाजाने राजीनामा द्यावा लागला.
भ्रष्टाचाराविरोधात खंबीरपणे लढणाऱ्या दमानिया यांनी यापूर्वीही अनेक लढे दिले आहेत.
दमानिया यांच्या पाठपुराव्यामुळेच डोरिन फर्नांडिस या वृद्ध महिलेला न्याय मिळाला आहे.
डोरिन फर्नांडिस केसमध्ये अखेर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना साडे आठ कोटी रुपये द्यावे लागले.
त्या दरवर्षी कोट्यवधीचा इन्कम टॅक्स भरतात, 56 देश फिरल्या आहेत.