सरकारनामा ब्यूरो
सुभाष देशमुख यांचा जन्म शिक्षकाच्या घरात झाला.
वडील शिक्षक असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबासाठी उदरनिर्वाह करणे सोपे नव्हते.
खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांच्यावर जबाबदारी पडल्यामुळे त्यांना कष्टाची चांगलीच जाण होती.
कौटुंबिक परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली.
कमी वयातच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामं केली.
लिपिक म्हणून तर कधी किराणा दुकानात काम करणे यांसारखीही अनेक कामे त्यांना करावी लागली.
देशमुख हे दक्षिण सोलापूरचे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
राज्य सरकारमध्ये त्यांनी सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषवले.
आमदार सुभाष देशमुख हे लोकमंगल ग्रुपचे संस्थापक आहेत. या ग्रुपमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.
R