सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून काही राजघराण्यातील लोकांचा समावेश देशाच्या राजकरणात होतो.
यात मंडा, भदरी, कलाकांकर, जनसंघ आणि दिलीपपूर या उत्तर प्रदेशामधील पाच राजघराण्याचं नाव येतं. या राजघराण्यातील मंडळींनी पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री आणि राज्यपाल या पदाचा कार्याभार सांभळला.
1995 ला भदरी राजघराण्यातील राजा राय बजरंग बहादूर सिंह यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली त्यांनी 1963 पर्यंत या पदाचा कार्याभार सांभळला. राजा भद्री यांनी महात्मा गांधींच्या असहकार चळवळीला पाठिंबा देत यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मांडा राजघराण्यातील विश्वनाथ सिंग 41वे राजा होते. हे 1969 पासून राजकारणात सक्रीय होते. यांना अर्थमंत्री, संरक्षमंत्री अशी पदे देण्यात आली होती. 1980 मध्ये विश्वनाथ सिंग यांची नियुक्ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. सिंह हे 1989 ला देशाचे आठवे पंतप्रधान झाले.
कालाकांकर राजघराण्यांचे राजकारण फक्त यूपीपुरतेच मर्यादित होते. काही राजघराणे वाचवण्यासाठी राजकारणात आले. तर काहींनी कालाकांकर राजघराण्याला राजकारणापासून लांब केले. 1857 ते 1947 पर्यंतचा काळात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या राजघराण्यांनी खूप मदत केली.
दिलीपपूर राजघराण्यातील राजा अमरपाल सिंह हे विधान परिषदेचे सदस्य होते.