सरकारनामा ब्यूरो
जर तुमच्याकडे कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची ताकद आणि धैर्य असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळते, असे म्हटले जाते. अशीच सक्सेस स्टोरी आहे IPS अधिकारी शरण कांबळे यांची.
शरण कांबळे हे राजस्थान केडरचे IPS अधिकारी आहेत.
शरण हे मूळचे सोलापूरचे राहणारे असून त्यांचे वडील मजूर आणि आई भाजी विक्रेते होत्या. IPS होण्याआधी शरण यांना त्यांच्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता.
त्यांनी त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातील सरकारी शाळेतून घेतले. अकरावी आणि बारावीसाठी त्यांनी 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील काॅलेजमध्ये प्रवेश घेतला.
उच्च शिक्षणासाठी त्यांनी सांगलीच्या वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून बी.टेकची पदवी मिळवली आणि नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISc) मधून पदव्युत्तरची पदवी प्राप्त केली.
पदव्युत्तर शिक्षणानंतर शरण यांना वर्षाला 20 लाख रुपये असलेली पगारीच्या नोकरीची ऑफर आली. पण त्यांची देशसेवा करण्याची इच्छा असल्याने त्यांनी ही ऑफर नाकारली.
UPSC परीक्षेची तयारी करण्यासाठी ते दिल्लीला गेले. महाराष्ट्र सरकारच्या योजनेअंतर्गत अर्ज करून त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आणि 2020 ला UPSC परीक्षेत 542वा रँक मिळवत त्यांना IPS मध्ये स्थान मिळाले
2021ला, त्यांनी पुन्हा परीक्षा देत 127वा क्रमांक मिळवला, ज्यामुळे त्याना IFS केडर मिळाला, परंतु शरण कांबळे यांनी IPS मध्येच राहण्याचा निर्णय घेतला.