Aslam Shanedivan
दरवर्षी हजारो उमेदवार नागरी सेवा परीक्षेला बसतात पण त्यापैकी फार कमी उमेदवारच अधिकारी पदापर्यंत पोहचतात
असेच काही टॉपर्स असतात ज्यांचा प्रवास हा केवळ यशाची कहाणी नाही तर त्यांच्या अथक प्रयत्नांचे आणि ध्येयाप्रती समर्पणाचे उदाहरण आहे.
असेच एक नाव सृष्टी देशमुख हिचे असून जे धैर्य आणि दृढनिश्चयाचा पुरावा आहे.
भोपाळच्या सृष्टी देशमुखने 2018 मध्ये यूपीएससीमध्ये ऑल इंडिया 5 वी रँक मिळवला होता. तो ही टीव्ही बघत. यामुळे तिचे नाव सर्वत्र घेतले जाते.
भोपाळची सृष्टी देशमुखचा जन्म 28 मार्च 1996 चा असून तिचे वडील जयंत देशमुख एका खाजगी कंपनीत अभियंता आणि आई सुनीता देशमुख एका खाजगी शाळेत शिक्षिका आहे.
सृष्टी देशमुखचे कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले असून बारावीत तिने 93 टक्के गुण मिळाले होते
सृष्टीने 2018 मध्ये केमिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. त्याचवेळी तिने कठीण अशा नागरी सेवा परीक्षेची तयारीही सुरू केली होती.
सृष्टीने 2018 मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवताना 895 गुण आणि मुलाखतीत 173 गुण मिळवत ती महिला टॉपर ठरली होती.