Chetan Zadpe
सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी त्यांचा लुसियाना वेनेटो, इटली या देशात जन्म झाला.
प्राथमिक सदस्य म्हणून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर केवळ 62 दिवसांत सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.
1999 मध्ये त्यांनी कर्नाटकातील बेल्लारी येथे भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचा पराभव करून लोकसभा निवडणूक जिंकली.
त्यानंतरच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत .
सोनिया गांधी यांनी सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा राहण्याचा विक्रम केला आहे. 1998 ते 2017 या काळात त्यांनी हे पद भूषवले होते.
प्रकृती अस्वास्थामुळे त्यांनी काँग्रेस अध्यक्षपद सोडले. यानंतर त्यांचे पुत्र खासदार राहुल गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली.
2019 च्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला, यामुळे नैतिकेच्या आधारावर राहुल गांधी यांनी राजीनामा दिली. यानंतj 2022 पर्यंत सोनिया गांधी यांना पक्षाच्या हंगामी अध्यक्षा झाले. ऑक्टोबर 2022 मध्ये मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाले.