Jagdish Patil
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले आहे.
या पुस्तकातून सोनिया यांनी इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या काळातील अनेक राजकीय घडामोडींना उजाळा दिला आहे.
नवी दिल्ली येथे सोमवारी (ता. १६) या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
CM जोसेफ विजय, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक दिग्गज नेते या सोहळ्याला उपस्थित होते.
फोटो
या पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील काही खास फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यातील एका फोटोमध्ये राहुल आई सोनिया गांधी यांच्या हनुवटीला प्रेमाने स्पर्श करताना दिसत आहेत.
राहुल आणि सोनिया गांधी यांच्यातील हा जिव्हाळ्याचा क्षण सध्या लक्ष वेधून घेत आहे.
दुसऱ्या एका फोटोमध्ये सोनिया गांधी मुलगी प्रियांका गांधी यांना प्रेमाने मिठी मारताना दिसत आहेत.
याच कार्यक्रमात राहुल यांनी आई-वडिलांच्या आयुष्यातील हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या.