Roshan More
प्रधानमंत्री संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) ने सोनिया गांधी यांना पत्र पाठवून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे खासगी कागदपत्रे मागितली आहेत. या कागदपत्रांमध्ये नेहरुंच्या पत्रव्यवहाराचा समावेश आहे.
पंडीत जवाहरलाल नेहरु यांची खासगी कागदपत्रे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु संग्रहालय आणि ग्रंथालयाला (NMML) दान केली होती.
सोनिया गांधींकडे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची खासगी कागदपत्रे आहेत. जी त्यांनी 2008 मध्ये तत्कालीन पंडित जवाहरलाल नेहरु संग्रहालय आणि ग्रंथालयातून परत घेतली होती.
पंडित जवाहरलाल नेहरु संग्रहालय आणि ग्रंथालयाचे (NMML) नाव बदलून प्रधानमंत्री संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) असे करण्यात आलेले आहे.
सोनिया गांधी यांच्याकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांची खासगी कागदपत्रे असलेले 51 बाॅक्स असल्याचे सांगितले जाते.
PMML च्या पत्रानुसार सोनिया गांधीकडे असलेल्या नेहरुंच्या कागदपत्रांमुळे इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना मदत होईल.
सोनिया गांधी यांच्याकडून PMML च्या पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही.