Dilip Mane Join Congress : दिलीप मानेंची ‘दक्षिण मोहिमे’ची तयारी...

Vijaykumar Dudhale

दक्षिण सोलापूरमधून 2009 मध्ये विजयी

काँग्रेस नेते दिलीप माने यांनी 2009 च्या निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते विजयी झाले होते.

Dilip Mane | Sarkarnama

मोदी लाटेत पराभव

मोदी लाटेत झालेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघात दिलीप माने यांचा भाजपचे सुभाष देशमुख यांच्याकडून पराभव झाला होता.

Dilip Mane | Sarkarnama

शिवसेनेत प्रवेश

दिलीप माने यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांना त्यांचा हक्काचा दक्षिण सोलापूर मतदारसंघ सोडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी लागली. त्या निवडणुकीत त्यांचा प्रणिती शिंदे यांच्याकडून पराभव झाला.

Dilip Mane | Sarkarnama

सोलापूर शहर मध्य मतदारसंघात पराभव

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील पराभवानंतर दिलीप माने हे पक्षीय राजकारणासून काहीकाळ अलिप्त होते. मात्र, त्यांनी दक्षिण सोलापूरमधून विधानसभेसाठी पुन्हा रणशिंग फुंकले होते. पण त्यांचा पक्ष ठरत नव्हता.

Dilip Mane | Sarkarnama

काँग्रेस प्रवेश निश्चित

महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यानंतर ते आघाडीशी कनेक्ट झाले आणि त्यानंतर थोड्याच दिवसांत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झाले होते.

Dilip Mane | Sarkarnama

मुंबईत काँग्रेस पक्षात प्रवेश

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनात दिलीप माने यांनी आज काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला.

Dilip Mane | Sarkarnama

प्रणिती शिंदे यांना फायदा

लोकसभा निवडणुकीत माने यांच्या संघटनात्मक ताकदीचा प्रणिती शिंदे यांना फायदा होऊ शकतो. मात्र, दिलीप माने यांचे लक्ष्य विधानसभा आहे.

Dilip Mane | Sarkarnama

विधानसभेचा शब्द मिळाला का?

काँग्रेस नेतृत्व तथा सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून त्यांना विधानसभेचा शब्द मिळाला आहे का, याची उत्सुकता माने यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

Dilip Mane | Sarkarnama

सरपंच ते आमदार; आता व्हायचंय खासदार; कोण आहेत बळवंत वानखेडे

MLA Balwant Wankhede | Sarkarnama