Jagdish Patil
हरियाणातील हिसार येथील युट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
ज्योती मल्होत्रासह रामपूरच्या शहजाद वहाबने देखील गेरगिरी केल्याचं समोर आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्योती दिल्लीला जात आहे असं सांगून पाकिस्तानला जायची. भरपूर पैसा मिळवून लक्झरी आयुष्य जगण्यासाठी तिने असं केलं.
ज्योतीने भारताशी गद्दारी केली असली तर आपल्या देशासाठी शत्रुंच्या गोठात जाऊन माहिती गोळा करणाऱ्या हेरांना किती पगार दिला जातो, ते जाणून घेऊया.
बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, नाटोच्या संशोधन केंद्रात युद्धनौका आणि पाणबुड्यांबद्दल माहिती गोळा करणाऱ्या शास्त्रज्ञाला चीनने 20 हजार डॉलर्स म्हणजेच 17 लाख दिले होते.
अमेरिकन गुप्तचर संस्था CIA माजी प्रमुख जोना मेंडेझ यांनी म्हटले होते की, हेर आणि GSA किंवा IRS सारख्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांच्या पगारात कोणताही फरक नाही.
त्यांनी सांगितलं की, "गुप्तहेर किती महत्त्वाची माहिती पुरवतो यावर त्याचा पगार अवलंबून असतो. यावेळी त्यांनी अमेरिकन एजंट अॅडॉल्फ टोलकाचेवला अब्जावधी डॉलर्स पगार मिळायचा."
रशियाच्या गुप्तचर संस्थेच्या FSB नुसार, त्यांचे संचालक अलेक्झांडर बोर्टनिकोव्ह यांचे वार्षिक उत्पन्न 152,200 डॉलर होते. जे रशियाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींच्या उत्पन्नापेक्षा 20 टक्क्यांनी जास्त होते.