Chetan Zadpe
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे उत्तम संगीतकार होते. उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केलं.
श्रीकांत ठाकरे यांना उर्दू ही भाषा उत्तम लिहीता, वाचता आणि बोलता येत असे. यातून मोहम्मद रफी आणि ठाकरे यांचे स्वरमय तार जुळले.
एकाच वेळेस वादक, संगीतकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, पत्रकार, चित्रपट समीक्षक, मार्मिकचे कार्यकारी संपादक, होमिओपॅथिकचे जाणकार, फोटोग्राफी इत्यादी गोष्टींचे ते व्यासंगी होते.
हिंदीतील त्यावेळेचे आघाडीचे गायक मोहम्मद रफी यांची मराठी गीतांशी गट्टी जुळवण्याची किमया श्रीकांत शिंदे यांनीच साधली.
बाळासाहेब ठाकरे यांचे बंधू आपली एवढीच ओळख मर्यादित न ठेवता त्यांनी संगीत क्षेत्रावर आपली ठळक मुद्रा उमटवली
ज्यावेळी लग्न झालं, त्यांनतर त्यांनी वडील प्रबोधकारांना विचारलं कुटुंबातल्या सदस्यांची नावं काय ठेवायची? तेव्हा ते म्हणाले, संगीत क्षेत्राला साजेशी नावं ठेवू, त्यांनी पत्नी कुंदा ठाकरे यांचं नाव ठेवलं मधुवंती, पहिली मुलगी जयवंती आणि मुलगा स्वरराज अशी नावे ठरली.
राज ठाकरे म्हणतात, 'शिवसेना स्थापन झाली नसती तर वडीलांनी संगीत क्षेत्रात आणखी खूप काम केलं असतं. बाळासाहेबांना ठाकरेंना अटक झाली तेव्हा मार्मिकची सगळी जबाबदारी त्यांनी पेलली.'
मोहम्मद रफी यांच्याशिवाय शोभा गट्टू, आशा भोसले, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर इत्यादी दिग्गज गायकांनी श्रीकांत ठाकरे यांच्याकडे गायली आहेत.