Vijaykumar Dudhale
श्रीनिवास पाटील यांचा जन्म 11 एप्रिल 1941 रोजी सातारा जिल्ह्यातील मारुल हवेली (ता. पाटण) येथे झाला.
श्रीनिवास पाटील यांचे शिक्षण पुणे आणि मुंबई विद्यापीठातून झाले. पुण्यात शिकत असतानाच त्यांची शरद पवार यांच्याशी मैत्री झाली. भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७३ च्या बॅचचे श्रीनिवास पाटील हे अधिकारी आहेत. त्यांनी बीड आणि पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे ते उपसचिवही होते.
भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1973 च्या बॅचचे श्रीनिवास पाटील हे अधिकारी आहेत. त्यांनी बीड आणि पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे ते उपसचिवही होते.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची 1999 मध्ये स्थापना केल्यानंतर श्रीनिवास पाटील यांना नोकरीचा राजीनामा द्यायला लावला. त्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कराडमधून राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता.
कराड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी 2004 मध्येही सलग दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली
यूपीए सरकारने श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमचे राज्यपाल म्हणून 2013 मध्ये नियुक्ती केली. त्यांनी 2018 पर्यंत राज्यपाल पदाचा आपला कार्यकाळ पूर्ण केला.
उदयनराजे भोसले यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवली. त्यात निवडणुकीत पाटील यांनी उदयनराजे यांचा तब्बल 87 हजार मतांनी पराभव केला होता.
विधानसभेबरोबर झालेली 2019 ची पोटनिवडणूक ही शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे संपूर्ण राज्यात गाजली होती. श्रीनिवास पाटील यांच्यासाठी पवारांनी ती शेवटची सभा घेतली होती.
जरांगेंनी बारसकरांबाबत केले 'हे' खळबळजनक दावे