Rashmi Mane
पिंपरी-चिंचवडचे खासदार श्रीरंग बारणे यांचा आज वाढदिवस.
गेल्या 25 वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात श्रीरंग बारणे यांचे नाव घेतले जाते.
पिंपरी-चिंचवडच्या विकासात बारणे यांचा मोठा हात आहे. संसदरत्न, महासंसदरत्न, विशिष्ट संसदरत्न पुरस्काराने त्यांचा गौरव झाला आहे.
पिंपरी पालिकेतील नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, गटनेता, शहराध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत.
राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना बारणे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा पक्षीय प्रवास त्यांनी केला आहे.
सहकार क्षेत्रातील आदराने घेतले जाणारे नाव, तसेच मावळ मुळशीतील ज्येष्ठ नेते हिरामण बारणे यांचे श्रीरंग हे कनिष्ठ बंधू आहेत.
खासदार श्रीरंग बारणे अनेक वर्षांपासून समाजकारण, राजकारणात कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेत 25 वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे.
2014 मध्ये शिवसेनेकडून मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे देशाच्या लोकसभेत गेले आणि पुन्हा 2019 च्या निवडणुकीतही सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी होत बारणे यांनी संसद गाठली.
R