सरकारनामा ब्यूरो
एसएसबी सशस्त्र सीमा दल हे नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात केलेले तसेच देशातील अंतर्गत सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेची कर्तव्ये पार पाडणारे भारतीय सीमा रक्षक दल आहे.
देशातील सात केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आणि भारताच्या सीमेवर उत्कृष्ट बॉर्डर गार्डिंग फोर्स म्हणून कार्य करणारे दल आहे.
1963 च्या भारत-चीन युद्धानंतर भारताच्या सीमावर्ती भागांना बळकट करण्यासाठी या दलाची स्थापना करण्यात आली.
सुरुवातीला या दलाला स्पेशल सर्व्हिस ब्युरो या नावाने ओळखले जात होते, कारण याचे प्राथमिक कार्य परदेशी इंटेलिजन्स ब्युरोच्या गुप्तचर विभागाला सशस्त्र सहाय्य प्रदान करणे होते.
नेपाळ आणि भूताननंतर या दलाचे कार्य वाढत गेले आणि भारताच्या चारही दिशेला सीमावर्ती भागात विस्तार करण्यात आला.
चीन आर्मीच्या आक्रमक कृतींवर नियंत्रण करत त्यांचा प्रतिकार करणे हे या दलाचे प्राथमिक उद्दिष्ट होते.
2001 मध्ये स्पेशल सर्व्हिस ब्युरोची जबाबदारी RAW कडून गृह मंत्रालयाकडे हस्तांतरित केल्यावर त्याचे नाव सशस्त्र सीमा दल करण्यात आले.
दलाच्या सुरक्षा व्यवस्थेत अधिक सुधारणा करत मंत्रालयाच्या शिफारशीनुसार हे दल भारत नेपाळ सीमेसाठी बॉर्डर गार्डिंग फोर्स आणि लीड इंटेलिजन्स एजन्सी म्हणून घोषित करण्यात आले.
हे देशातील पहिले सीमा रक्षक दल आहे ज्यामध्ये महिलांचे स्वतंत्र बटालियन आहे.