Aslam Shanedivan
ST ने प्रवास करणाऱ्या महिला आणि जेष्ठ नागरिकांना दिलासा देणारा निर्णय काहीच दिवसांपूर्वी महामंडळाने घेतला होता.
महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) ची मुदत वाढवली होती. यानंतर आता नोंदणीमध्ये देखील बदल करण्यात आला आहे.
सटीच्या NCMC कार्ड नोंदणी प्रोसेसमध्ये २१ सप्टेंबर २०२६ पासून हा बदल करण्यात आला असून आधार OTPच्या आधारे आता नोंदणी करता येईल.
बायोमेट्रिक जुळत नसल्याने हा बदल करण्यात आला असून या नव्या पर्यायामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
तसेच कार्ड हरवल्यास फक्त १९९ रुपये भरून नवीन कार्ड घेता येणार आहे.
NCMC कार्डसाठी १९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी केल्यास त्या कार्डचे २५ सप्टेंबरपासून वितरण केले जाणार आहे.
तसेच नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना QR कोड असलेली पावती दिली जाणार आहे. जी ३० दिवसांपर्यंत ग्राह्य असेल.
मात्र या कालावधीत QR कोड असलेली पावती असली तरी सवलतीचे तिकीट मिळणार नाही.