तरुणांनो, सज्ज व्हा! एसटी महामंडळात ऐतिहासिक भरतीचा धमाका; 18 हजार जागांसाठी मेगाभरती

Rashmi Mane

तरुणांनो, सज्ज व्हा!

एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणावर भरतीची घोषणा झाली आहे. राज्यभरातील हजारो युवक-युवतींसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. जवळपास 18 हजार पदांसाठी लवकरच मेगाभरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

msrtc jobs recruitment 2026 | sarkarnama

परिवहन महामंडळ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अनेक वर्षे आर्थिक अडचणीत होतं. मात्र महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सवलत दिली गेली. त्यामुळे एसटी प्रवासाला पुन्हा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला.

msrtc jobs recruitment 2026 | sarkarnama

मनुष्यबळ वाढवण्याची गरज

प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एसटी सेवेला नवी उभारी मिळाली आहे. वाढत्या प्रवासीसंख्येमुळे बससेवा अधिक सक्षम करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

msrtc jobs recruitment 2026 | Sarkarnama

रोजगाराच्या नव्या संधी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा करत सांगितले की एसटी महामंडळात 17,742 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

msrtc jobs recruitment 2026 | Sarkarnama

नव्या कर्मचाऱ्यांची गरज

एसटी महामंडळ दरवर्षी 5,000 नवीन बसेस खरेदी करण्याचे धोरण राबवत आहे. त्यामुळे बससेवा वाढवण्यासाठी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे.

msrtc jobs recruitment 2026 | Sarkarnama

अधिकृत प्रक्रिया लवकरच

या पार्श्वभूमीवर होणारी ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली. लवकरच याबाबत अधिकृत प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

msrtc jobs recruitment 2026 | Sarkarnama

भरतीत विशेष प्राधान्य

2022 मध्ये झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या दीर्घ संपाच्या काळात सेवा बजावलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत विशेष प्राधान्य देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

msrtc jobs recruitment 2026 | Sarkarnama

मेगा भरती

सध्या एसटीच्या ताफ्यात 14,000 पेक्षा अधिक बसेस आहेत. सरकारने दरवर्षी 5,000 बसेस खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे एसटी सेवा अधिक मजबूत करण्यासाठी ही मेगा भरती महत्त्वाची ठरणार आहे.

msrtc jobs recruitment 2026 | Sarkarnama

Next : बापूसाहेब बनला खऱ्या आयुष्यात 'साहेब'; वडील वॉचमन, आई धुणीभांडी करायची...

येथे क्लिक करा