Rashmi Mane
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
या निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाहीत, तर सत्तेची दिशा ठरवणाऱ्या मानल्या जात आहेत. अशा वेळी शिवसेनेने मोठा आणि निर्णायक पाऊल उचलले आहे.
निवडणूक रणांगणात ताकद दाखवण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीने सज्ज झाली आहे. पक्षाने आपल्या प्रचाराची दिशा ठरवत ‘स्टार प्रचारकांची’ अधिकृत यादी जाहीर केली आहे.
या यादीत राज्य व केंद्रातील अनुभवी नेत्यांचा समतोल साधण्यात आला आहे. मंत्री, खासदार, आमदार, प्रवक्ते आणि विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांचा समावेश असल्याने प्रचार अधिक प्रभावी होणार असल्याचे चित्र आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचारयंत्रणा उभी राहणार आहे. त्यांच्यासोबत रामदास कदम, गजानन कीर्तिकर, डॉ. श्रीकांत शिंदे यांसारखे वजनदार नेते प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई, दादाजी भुसे, संजय राठोड यांसारख्या नेत्यांच्या अनुभवाचा प्रचारात मोठा फायदा होणार आहे.
भरत गोगावले, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह पक्ष संघटन मजबूत करणाऱ्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले आहे.
या यादीत युवासेना, महिला नेत्या आणि अल्पसंख्याक विभागालाही महत्त्व देण्यात आले आहे. यामुळे तरुण, महिला आणि विविध समाजघटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसत आहे.