Aslam Shanedivan
सध्याचे शिक्षण खर्चीक झाले असून सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर शिक्षण गेल्याची अनेकदा तक्रार होत असते.
पण भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत 10 मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण मोफत उपलब्ध आहेत.
यात डिझाइन थिंकिंग आणि मॅनेजरियल अकाऊंटिंग कोर्सेस असून डिझाईन थिंकिंग अँड पीपल सेंटर्ड डिझाईन' हा अभ्यासक्रम आयआयटी कानपूरचा आहे. तर आयआयटी मुंबईने मॅनेजरियल अकाऊंटिंग कोर्सेस बनवला आहे
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा कम्युनिकेशन आणि उत्पादकता सुधारण्यास मदत करणारा कोर्स असून डिजिटल मार्केटिंग एसइओ, अॅनालिटिक्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजीजवर आधारीत आहे.
आर्थिक आव्हानांना तोंड देताना रिकव्हरी प्लान कसा तयार करावा? हे स्ट्रॅटर्जी यातून शिकवले जाते. तर कंझुमर बिहेवियर अभ्यासक्रमातून ग्राहकांचे मानसिक आणि सामाजिक वर्तन समजून घेण्यास मदत मिळते.
आयआयटी कानपूरचा परस्पर संवाद आणि एकूण व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित असणारा कोर्स आत्मविश्वास आणि नेतृत्व कौशल्य विकसित करतं
डेटा विश्लेषक अभ्यासक्रमातून डेटाचे विश्लेषण करणे आणि त्यातून धोरणे तयार करण्याचे कौशल्य शिकवले जाते.
आयआयटी मुंबईच्या मास्टर्स फायनान्शियल अॅनालिस्ट स्किल्स आणि मॅनेजरियल इकॉनॉमिक्स कोर्समधून अर्थशास्त्र, आर्थिक नियोजन आणि व्यवसाय याबद्दल शिकवले जाते.