Pradeep Pendhare
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मोजणी सकाळी दहा वाजता सुरू होईल.
मतमोजणीची प्रोसेस अहिल्यानगरच्या जामखेड नगरपालिकेचे CEO अजय साळवे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितली.
नगरपालिकांसाठी झालेले मतदानाची मोजणी प्रभाग आणि केंद्रनिहाय सुरूवात होईल.
प्रत्येक प्रभागाची मतमोजणी स्वतंत्र टेबलवर होईल आणि लगेचच नगरसेवक पदाचा निकाल जाहीर होतील.
नगराध्यक्षपदाचं मतदानाची मोजणी शेवटीच्या फेरीपर्यंत सुरू राहणार आहे.
नगरपालिकांसाठी जिथं पोस्टल मतदान झालं आहे, तिथं पोस्टल मतदानाची अगोदर मोजणी होईल.
नगरपालिका आणि नगरपंचायतीची मतमोजणी अवघ्या दोन ते तीन तासांत उरकेल, असा अंदाज आहे.
अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर तो राज्य निवडणूक आयोगाकडे प्रशासनाच्या माध्यमातून सादर केला जाईल.
मतमोजणी संदर्भात आक्षेप असल्यास, नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदाच्या उमेदवारांना तत्काळ तक्रार करावी लागणार आहे.