Ganesh Sonawane
भारतीय राज्यघटनेच्या कलम 243Z(A) व 243K अन्वये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे.
महाराष्ट्रात 26 एप्रिल 1994 रोजी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली.
राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख राज्य निवडणूक आयुक्त असतात.
राज्य निवडणूक आयोगावर राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था (ULB) म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका / नगरपंचायती व ग्रामीण भागातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जवाबदारी आहे.
मात्र लोकसभा, विधानसभा व विधान परिषद इ.च्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगावर असते, त्याचा राज्य निवडणूक आयोगाशी संबंध नसतो.
राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत अनन्य अधिकार आहेत.
त्यात निवडणूक कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कार्यवाहीचेही अधिकार आहेत. तसेच, ज्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा तपशिल सादर केला नाही त्यांना अपात्र ठरविणे इत्यादी अधिकारही या आयोगास आहेत.
राज्य निवडणूक आयोगाचे कार्यालय मुंबई येथे आहे.