State Festivals of India : परंपरा आणि संस्कृतीचा गौरव! महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांचे अधिकृत ‘State Festival’ कोणते?

Rashmi Mane

"स्टेट फेस्टिव्हल्स"

भारताची ओळख ही त्याच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि सणांमुळे आहे. महाराष्ट्राचा गणेशोत्सव जसा राज्योत्सव आहे, तसंच अनेक राज्यांनी आपले खास सण अधिकृत State Festival म्हणून घोषित केले आहेत. चला जाणून घेऊया कोणते ते!

अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेश पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिव्हल 2019 मध्ये स्टेट फेस्टिव्हल म्हणून घोषित करण्यात आला आहे. या सणाद्वारे हॉर्नबिल पक्ष्याचे संवर्धन आणि स्थानिक जमातींचे पारंपरिक आदिवासी ज्ञान पुढे नेले जाते.

मणिपूर

चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात मणिपूरच्या राज्यफुलाला 2017 मध्ये शिरुई लिली फेस्टिव्हल हा राज्योत्सव घोषित झाला होता.

त्रिपुरा

2015 मध्ये मैतेई उमंग लाई हराओबा या उत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा मिळाला.
“उमंग लाई” हा उत्सव असतो. या सणात पारंपरिक विधी, नृत्य, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात.

झारखंड

ओरावन आदिवासींचा हा धार्मिक सोहळा असतो. हजारो भाविक दरवर्षी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. या उत्सवाला 2025 मध्ये राज्योत्सवाचा दर्जा मिळाला.

कर्नाटक

कर्नाटकातील मैसूर दशहरा आधीपासूनच जगप्रसिद्ध असून आता अधिकृत राज्योत्सव म्हणून गौरविला गेला आहे. नवरात्रीतील दहा दिवस हा सोहळा चालतो व विजयादशमीला हत्तींच्या मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम, राजदरबारी सोहळे पाहायला मिळतात.

आंध्र प्रदेशात

अहोबिलम परुवेट उत्सव 2024 मध्ये राज्योत्सव म्हणून जाहीर झाला. हा नरसिंहस्वामीवर आधारित शेकडो वर्षे जुना पारंपरिक शिकार-उत्सव आहे. आरासावली रथसप्तमी हाही राज्योत्सव आहे.

तेलंगणात

तेलंगणात 2024 मध्ये सदर संमेलन (म्हशींची मिरवणूक) हा राज्योत्सव झाला. म्हशींना सजवून काढली जाणारी अनोखी मिरवणूक, लोकसंगीत आणि सणासुदीचा उत्साह असतो.

उत्तराखंड

उत्तराखंडात 2022 पासून मा वाराही बगवाल मेला राज्य सरकारी उत्सव ठरला आहे. चंपावत येथे राखी पौर्णिमेला होणाऱ्या या मेळ्यात विशेष धार्मिक विधी होतात.

Next : गणेशोत्सव की राजकारणाची शाळा? मंडळातून नेता होण्याचा मार्ग

येथे क्लिक करा