Vijaykumar Dudhale
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बीड जिल्ह्यातील धारूर येथील साखर कारखान्याला 97 कोटी 76 लाखांच्या कर्जाला थकहमी दिली आहे.
भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे समर्थकाच्या ताब्यात आलेल्या मंगळवेढ्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला 94 कोटींची मदत होणार आहे.
पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या पाथर्डीतील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला 93 कोटी रुपये मिळणार आहेत.
अजित पवार गटाचे नरेंद्र घुले यांच्या नेवासा येथील लोकनेते मारुतीराव घुले पाटील सहकारी साखर कारखान्याला 140 कोटी रुपयांची मदत मिळणार आहे.
अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांच्या वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याला 327 कोटी, तर खंडाळा येथील किसन वीर कारखान्याला १४० कोटी रुपये मिळणार आहेत.
अजित पवार गटाचे नगरच्या अकोले तालुक्यातील सीताराम गायकर यांच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याला 94 कोटी रुपये कर्ज मिळणार आहे.
भाजपला समर्थन केलेले आमदार विनय कोरे यांच्या वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याला 327 कोटी रुपये मिळणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये गेलेले बसवराज पाटील यांच्या उमरगा येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याला 94 कोटी रुपये मिळणार आहेत.
भाजप नेते रमेश आडसकर यांच्या अंबाजोगाई येथील अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याला 80 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केले जाणार आहे.
अजित पवार गटाचे राजेंद्र नागवडे यांच्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याला 103.40 कोटी रुपयांची मदत होणार आहे.