Rashmi Mane
देशभरात महिलांना सशक्त करण्यासाठी राज्य सरकारांनी आर्थिक सहाय्याच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. पाहूया कोणते राज्य महिलांना देते सर्वाधिक दरमहा मदत!
महाराष्ट्रात सरकारने ‘लाडकी बहीण योजना' सुरु केल्यामुळे महिलांना 1,500 प्रतिमहिना मदत मिळत आहे. त्यामुळे लाखो महिलांना घरखर्च आणि बचतीत दिलासा मिळाला आहे.
झारखंडमध्येही ‘मैय्या सन्मान योजने’ अंतर्गत महिलांना 2,500 प्रतिमहिना ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना आर्थिक बळ मदत मिळते.
हरियाणाच्या नवीन ‘लाडो लक्ष्मी योजने’तून पात्र महिलांना 2,100 प्रतिमहिना मदत दिली जाणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा हा मोठा निर्णय मानला जातो.
कर्नाटकात ‘गृहा लक्ष्मी योजने’तून प्रत्येक पात्र महिलेला 2,000 प्रतिमहिना थेट खात्यात जमा केली जाते. ही योजना लाखो गृहिणींसाठी मोठा आधार ठरली आहे.
मध्य प्रदेशात सुरू असलेल्या ‘लाडली बहना योजने’अंतर्गत महिलांना 1,250 प्रतिमहिना आर्थिक मदत मिळते. या योजनेने राज्यातील महिलांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
दिल्ली सरकारच्या महिला समृद्धी योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2,500 प्रतिमहिना आर्थिक मदत दिली जाते. ही देशातील महिलांना मिळणारी सर्वाधिक मासिक मदत आहे.