Chhatrapati Sambhaji Maharaj : ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’; पिंपरी-चिंचवडमध्ये उभारला जातोय संभाजी महाराजांचा जगातील सर्वांत उंच पुतळा

Rashmi Mane

पूर्णाकृती पुतळा

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’

‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ या नावाने त्यांचा भव्य-दिव्य आणि जगातील सर्वांत उंच पूर्णाकृती पुतळा उभारला गेला आहे. हा पुतळा तब्बल 100 फुटी असून तो ब्रॉंज धातूपासून साकारला गेला आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

महाराजांना मानवंदना

संभाजी महाराजांना मानवंदना म्हणून ढोल-ताशा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी 3000 ढोल, 1500 ताशे आणि 500 ध्वजांसह हा गगनभेदी सोहळा जल्लोषात पार पडला.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

कुठे आहे हा पुतळा?

बोराडेवाडी-मोशी परिसरात होत असलेल्या या प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून तब्बल 48 कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

ऐतिहासिक प्रकल्प

अद्याप काम सुरू असले तरी लवकरच हा ऐतिहासिक प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. या शंभुसृष्टीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

कशी असेल शंभुसृष्टी?

या पुतळ्यासोबतच 40 फूट उंच चौथरा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा पुतळा, तसेच 16 सेनापती आणि मावळ्यांची शिल्पे उभारली जाणार आहेत.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

जिवंत इतिहास

या संपूर्ण ‘‘शंभुसृष्टी’’त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनकार्याचा इतिहास जिवंत होणार आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj | Sarkarnama

Next : लंडनमध्येही लाखो लोक रस्त्यावर, 'लढा किंवा मरा' म्हणत मस्क यांची संसद बरखास्त करण्याची मागणी; पण का?

येथे क्लिक करा