Kunbi Caste Certificate : कुणबी सर्टिफिकेट कसं काढायचं? '....' मुद्द्यांमध्ये घ्या समजून

Rashmi Mane

महत्त्वपूर्ण निर्णय

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत पाच दिवस आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत झालेले आंदोलन यशस्वी ठरले. सरकारने कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात जीआर काढला आहे.

ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार

हैदराबाद गॅझेटिअर 1921 आणि 1931 मधील नोंदी विचारात घेतल्या जाणार आहेत. यामध्ये कापू या नावाने कुणबी जातीचा उल्लेख आहे.

कुणबी म्हणजे काय?

ज्यांचा मुख्य व्यवसाय शेती आहे, त्यांना कुणबी समजले जाईल. यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख मिळणार आहे.

समित्या स्थापन होणार

प्रत्येक गावात 3 सदस्यांची समिती असेल. त्यात ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी असतील.

अर्ज कसा करायचा?

ज्या मराठा व्यक्तीकडे जमिनीचा मालकी पुरावा नाही, त्यांनी 13 ऑक्टोबर 1975 पूर्वी त्या गावात राहत असल्याचा पुरावा द्यावा.

अधिकाऱ्यांची चौकशी

अर्जदाराच्या कागदपत्रांची चौकशी केली जाईल. गावातील नातेसंबंधातील कुणाकडे कुणबी प्रमाणपत्र असेल तर फायदा होईल.

प्रमाणपत्र मिळण्याची सोय

चौकशीनंतर पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र आरक्षणासाठी उपयोगी ठरेल.

Next : 61 लाखांच्या कारमधून मंत्री प्रताप सरनाईकांचा नातू जाणार शाळेत, देशातील पहिली 'टेस्ला' केली खरेदी! 

येथे क्लिक करा