Rajanand More
भारतीय शेअर बाजार कोसळल्याने मागील काही महिन्यांत भारतातील गर्भश्रीमंत, बड्या उद्योगपतींना अब्जावधींचा फटका बसला आहे. ब्लुमबर्ग बिलेनियस इंडेक्स डाटानुसार सात उद्योगपतींची संपत्ती तब्बल 34 अब्ज डॉलरने कमी झाली आहे.
उद्योगपती गौतम अदानी यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यांची संपत्ती मागील वर्षभरात तब्बल 10 अब्ज डॉलरने कमी झाली आहे. सध्या त्यांची संपत्ती 68.8 अब्ज डॉलर इतकी आहे.
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबाजनी यांची सध्याची संपत्ती 87.5 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यांचे सुमारे 3.13 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.
एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे अध्यक्ष शिव नादर यांच्या संपत्तीतही 7.13 अब्ज डॉलरने घसरली आहे. त्यांची सध्याची संपत्ती 36 अब्ज डॉलरपर्यंत कमी झाली आहे.
विप्रो उद्योगसमुहाचे अझीम प्रेमजी यांनाही शेअर मार्केटमधील घसरणीचा फटका बसला आहे. त्यांची संपत्ती 2.70 अब्ज डॉलरने कमी होऊन 28.2 अब्ज डॉलरवर स्थिरावली आहे.
अभियांत्रिकी आणि बांधकाम व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या शापूरजी पालनजी ग्रुपचे शापूर मिस्त्री यांची संपत्ती 4.52 अब्ज डॉलरने कमी झाली. आता त्यांची संपत्ती 34.1 अब्ज डॉलर एवढी आहे.
ओपी जिंदाल ग्रुपच्या सावित्री जिंदाल यांची सध्याची संपत्ती 30.1 अब्ज डॉलर एवढी आहे. मागील वर्षभरात त्यांना सुमारे 2.22 अब्ज डॉलरचा फटका बसला आहे.
सन फॉर्मा या औषध कंपनीचे दिलीप संघवी यांची संपत्ती कमी होत 25.3 अब्ज डॉलरपर्यंत घसरली आहे. त्यांचे 4.21 अब्ज डॉलर एवढे नुकसान झाले आहे.