Rashmi Mane
शिवसेनेची सुरुवात बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली. घरच्या घरी, फक्त 18 जणांच्या उपस्थितीत या संघटनेचा पहिला अध्याय लिहिला गेला.
1966 च्या मार्मिक या अंकातून शिवसेनेची घोषणा करण्यात आली. बाळासाहेबांनी तरुणांना एकत्र करत स्वतंत्र संघटना उभारण्याची तयारी सुरू केली.
सकाळी साडेनऊ वाजता प्रबोधनकार ठाकरे यांच्या हस्ते नारळ फोडून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’चा जयघोष झाला. शिवसेनेचा जन्म झाला!
या ऐतिहासिक सोहळ्यात फक्त 18 लोक होते. त्यात ठाकरे कुटुंबीय आणि मोजके सहकारी. कोणालाही तेव्हा हे वाटलं नसेल की ही सेना पुढे एवढं मोठं रूप धारण करेल.
प्रबोधनकार ठाकरे हे सामाजिक कार्यकर्ते होते. बाळासाहेबांच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला. त्यांच्या दादरच्या घरातच बैठकी होत आणि शिवसेनेचं बीज रुजलं.
संघटनेचं नाव काय ठेवायचं, यावर खूप चर्चा झाली. कुणालाही समाधानकारक नाव सुचत नव्हतं. सगळे विचार करत होते, पण निर्णय होत नव्हता.
शेवटी प्रबोधनकार ठाकरेंनी सुचवलं – “ही शिवाजी महाराजांची सेना आहे, नाव ठेवा ‘शिवसेना’.” आणि नाव ठरलं! हे नावच पुढे इतिहास घडवणारं ठरलं.
19 जून 1966 हा फक्त एक दिवस नव्हता, तर एका विचारांची चळवळ सुरू होण्याचा दिवस होता. आजही शिवसैनिकांसाठी हा दिवस प्रेरणादायी आहे.