Ranjit Patil : वैद्यकीय तज्ज्ञ ते गृहराज्यमंत्री असा राहिला रणजित पाटलांचा प्रवास

प्रसन्न जकाते

देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय

अकोल्याचे डॉ. रणजित पाटील भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नीकटवर्तीयांपैकी एक आहेत. वैद्यकीय तज्ज्ञ असलेले डॉ. पाटील अनेक वर्षांपासून भाजपमध्ये आहेत.

Devendra Fadnavis & Ranjit Patil | Sarkarnama

पदवीधर मतदार संघातून विजय

डॉ. रणजित पाटील हे विधान परिषेत अमरावती पदवीधर मतदार संघातून आमदार होते. गेल्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला.

Ranjit Patil | Sarkarnama

गृहराज्यमंत्रिपदाचा अनुभव

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना डॉ. रणजित पाटील हे गृहराज्यमंत्री होते. नगरविकास खातेही त्यांच्याकडे होते.

Ranjit Patil | Sarkarnama

गटबाजीचा फटका

अकोला भाजपमध्ये रणजित पाटील आणि विद्यमान खासदार संजय धोत्रे असे दोन गट आहेत. या गटबाजीचा फटका पाटील यांना बसला आहे. पद नसल्याने ते सध्या ‘बॅकफूट’वर आहेत.

Ranjit Patil | Sarkarnama

वादापासून दूर

डॉ. रणजित पाटील हे सातत्याने वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु भाजपच्या अकोल्यातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबाबत थोडी नाराजीही आहे.

Ranjit Patil | Sarkarnama

सध्या आहेत पडद्यामागे

कार्यकर्त्यांना लवकर भेट नाहीत. भाजपच्या कार्यक्रमांमध्ये हे हल्ली सहभागी नसतात, असे डॉ. रणजित पाटलांबाबत अकोल्यात अनेकांचे म्हणणे आहे.

Ranjit Patil | Sarkarnama

नव्या संधीची शक्यता

राजकारणातील बदलती परिस्थिती पाहता डॉ. रणजित पाटील यांना भाजपकडून नवीन संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Ranjit Patil | Sarkarnama

‘ट्विट’मुळे ‘ट्विस्ट’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याह अनेक नेत्यांनी डॉ. रणजित पाटलांना शनिवारी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यात ‘आमदार’ असल्ला उल्लेख असल्याने नवा ‘ट्विट’मुळे नवा ‘ट्विस्ट’ निर्माण झाला आहे.

Eknath Shinde | Sarkarnama

Next : मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने...

Manoj Jarange Patil News | Sarkarnama
येथे क्लिक करा