Vijaykumar Dudhale
भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याचे ठरविले आहे. धैर्यशील यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे.
काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे हे 2009 नंतर निवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच ‘शिवरत्न’वर आले होते. सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते.
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशापूर्वी ‘शिवरत्न’वर स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. या स्नेह भोजनाला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी आमदार धनाजी साठे, नारायण पाटील, डॉ. बाबासाहेब व अनिकेत देशमुख, अभिजित पाटील, बळीराम साठे उपस्थित होते.
स्नेह भोजनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या निर्णयाचा संदेश संपूर्ण राज्यात जाईल आणि राज्यात नक्कीच बदल दिसेल, असा आशावाद व्यक्त केला आहे.
मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत
धैर्यशील मोहिते पाटील यांच्या निर्णयाचा फायदा सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना होणार आहे. कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील समर्थकांची संख्या निर्णायक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांचा अकलूजमध्ये पक्षप्रवेश होत आहे
येत्या मंगळवारी (ता. 16 एप्रिल) धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत, त्यासाठी खुद्द शरद पवार हे सोलापूरला येणार आहेत.