Deepak Kulkarni
उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी असलेल्या कुटुंबात जन्म झालेल्या लविना सिन्हा यांची भारतीय नागरी सेवेतील एन्ट्री नक्कीच खास आहे.
गुजरातचे माजी मुख्य सचिव आणि राज्य निवडणूक आयुक्त राहिलेल्या वीरेश सिन्हा यांची लविना या मुलगी आहे.
भारतीय पोलिस सेवेच्या गुजरात केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत.
वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या सिन्हा यांनी 2016 च्या यूपीएससी परीक्षेत 183 वी रँक मिळवली आहे.
कुटुंबातच आयएएस आणि आयपीएस अधिकारी असून त्यांची निवडही गुजरात केडरमध्येच झाल्यानं त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.
वैद्यकीय विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करतानाच त्यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमी येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे.
लविना या प्रचंड हुशार आणि जिद्दी आहेत. त्यांनी पोलिस सेवेत एन्ट्री घेतल्यानंतर जी धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय अधिकारी ठरल्या.
वरिष्ठ अधिकारी असलेल्या लविना सिन्हा यांची गुन्हेगारी विश्वात त्यांच्या कठोर निर्णयांमुळे गुन्हेगारही त्यांच्यापुढे थरथर कापतात.