Rashmi Mane
डोनाल्ड ट्रम्प यांनी (भारतीय वेळेनुसार) सोमवारी रात्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर व्हाईट हाऊसमध्ये चर्चा सुरू आहे.
आता पुढील काही वर्ष, व्हाईट हाऊस हे ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबाचे नवीन निवासस्थान असणार आहे.
ट्रम्प ज्या व्हाईट हाऊसमध्ये राहणार आहेत ते केवळ सुरक्षेच्या दृष्टीनेच नाही तर वास्तुकलेच्या दृष्टीनेही खूप खास आहे.
या इमारतीची उभारणी 13 ऑक्टोबर 1792 रोजी झाली. यानंतर, ही जगप्रसिद्ध इमारत बांधण्यासाठी 8 वर्षे लागली.
या इमारतीची रचना आयर्लंडचे वास्तुविशारद जेम्स होबन यांनी केली होती. इमारतीच्या बांधकामानंतर त्याला "प्रेजिडेंट हाउस" असे नाव देण्यात आले.
व्हाईट हाऊस 55 हजार चौरस फूट क्षेत्रात पसरलेले आहे. या इमारतीत एकूण ६ मजले आहेत आणि त्यात एकूण 132 खोल्या आहेत.
इमारतीच्या आतच थिएटर, जकूझी, टेनिस कोर्ट, स्विमिंग पूल इत्यादी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये 35 बाथरूम, 412 दरवाजे, 147 खिडक्या, 28 स्वयंपाकघर, आठ जिने, एक जॉगिंग ट्रॅक आणि एक स्विमिंग पूल अशा अनेक सुविधा आहेत.