सरकारनामा ब्यूरो
'आयपीएस' लक्ष्य पांडे हे मूळचे उत्तराखंड येथील अलमोडा या जिल्ह्याचे आहेत.
दिल्लीतील गुरू गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठातून त्यांनी 'बीटेक'चे शिक्षण पूर्ण केले.
हुशार आणि अभ्यासाची आवड असल्यामुळे लहानपणीच त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी अधिकारी व्हायचं ठरवलं.
शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी 'यूपीएससी' परीक्षेची तयारी सुरू केली.
सलग तीन प्रयत्नांत अपयश आल्यानंतर चौथ्या प्रयत्नात त्यांनी 316 वा 'रँक' मिळवत 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण केली.
अभ्यासातील अनेक अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी कोणतेही 'कोचिंग' न घेता परीक्षेत यश प्राप्त केले.
लक्ष पांडे हे त्यांच्या 'फिटनेस' आणि 'स्टायलिश लूक'मुळे प्रसिद्ध आहेत.
तेे सध्या दिल्ली येथे 'एसीपी' म्हणून कार्यरत आहेत.
'सोशल मीडिया'वर सक्रिय असलेल्या लक्ष्य पांडे यांचे 'लाखो फॅन फॉलोअर्स' आहेत.